BRAMHAPURI । 03 April 2023.
आमच्या महिलेकडे का बघीतला? अशा संशयावरून गावात नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामावर आलेल्या परगावच्या मजुराला दोरीने ट्रॅक्टरला बांधुन बेदमपणे अमानुष मारहाण केल्याची घटना ब्रम्हपुरी (Bramhapuri) तालुक्यातील बेलगाव येथे घडली आहे.
बेलगांव (Belgaon) येथे नळ पाणीपुरवठा योजनेचा काम सुरू असून सदर कामाचे कंत्राट बीड जिल्ह्यातील भागवत जगताप या कंत्राटदाराला मिळाले आहे. त्यासाठी या कंत्राटदाराने बिडहून कामासाठी मजुर आणले आहेत. यापैकीच राहुल जमदाडे नावाच्या मजुराला दि. ०१ एप्रिल रोजी पाईप टाकण्याचे काम सुरू असतांना आमच्या महिलेकडे का बघितला म्हणून? गावातील नागरिकांनी बेदमपणे अमानुष मारहाण केली.
सदर मारहाणीचा video सोशल मीडियावर चांगलाच viral झाला आहे.
या गंभीर प्रकरणाबाबत कंत्राटदार भागवत जगताप यांनी पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे दिनेश अवसरे, निलेश अवसरे व गणेश अवसरे या तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भांदवि. कलम ३४१, २९४, ३५२, ५०६, ३२३ व ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.