कन्हाळगाव अभयारण्यातील वन्यजीव असुरक्षित?
CHNDRAPUR। 7 April 2023
चंद्रपूर-आष्टी राष्ट्रीय महामार्गावरील (National Highway 353B, Chandrapur-Ashti) कोठारी-झरण रस्त्यानजीक लोहखनिज वाहून नेणाऱ्या ट्रकच्या धडकेत बिबट (Leppard) ठार झाल्याची घटना घडली.
आज सकाळी ०८:०० च्या सुमारास ही घटना घडली असून वनविभागात चांगलची खळबळ उडाली आहे.
या महामार्गावरून सुरजागड लोहप्रकल्पातून (Surjagad project) लोहखनिज वाहून नेण्यासाठी दिवसरात्र मोठ्या प्रमाणावर ट्रकच्या फेर्या सुरू असतात. त्यामुळे दिवसेंदिवस या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते आहे.
अनेक वेळा हे लोहवाहू ट्रक वाहणे अतिवेगाने चालवल्या जातात त्यातून अपघात घडत असल्याचे स्थानिकांचे मत आहे.
याखेरीज याच महामार्गाच्या दोन्ही बाजूंस कन्हाळगाव अभयारण्य (kanhargaon wildlife sanctuary) लागून असल्यामूळे येथील वन्यजीवांच्या जिवाला सुद्धा धोका निर्माण झाला आहे आणि त्याची प्रचिती आजच्या बिबट्याच्या मृत्यू पुढे आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, कन्हाळगाव अभयारण्याच्या मध्यभागातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावरील कोठारी पासून सहा कीमी. अंतरावर असलेल्या झरण गावाजवळ महामार्ग ओलांडताना वाहणाची धडक बसल्याने बिबट गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती वनविकास महामंडळाचे कन्हाळगाव क्षेत्राचे वनाधिकारी सुधाकर राठोड यांना समजताच झरण आणि कन्हाळगाव क्षेत्राच्या वनकर्मचाऱ्यांसह ते घटनास्थळी हजर झाले. जखमी झालेल्या बिबट्यास तात्काळ चंद्रपूर येथील व्याघ्र उपचार केंद्रात दाखल करण्यासाठी रवाना करण्यात आले. मात्र रस्त्यातचं या बिबट्याचा मृत्यू झाला.
अभयारण्याच्या मध्य भागातूनच या महामार्गाने वाहनांची सारखी वर्दळ आणि अनियंत्रित वाहनामुळे मानवासह वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे.
यापूर्वीच भटाळी फाट्यावर वाहनाच्या धडकेत असाच एका बिबट्याचा मृत्यू झाला. यासोबतच या महामार्गावर हरीण, चितळ, अस्वल, रानटी डुक्कर अशा कित्येक प्राण्यांचे अपघाताने मृत्यू झल्याच्या घटना ताज्या आहेत.
भरधाव वाहनावर प्रतिबंध कुणाचे?
सुरजागड खाणीतून शेकडो वाहनांच्या सहाय्याने रात्रंदिवस लोहखनिज नेणे सुरू आहे. परंतू या वाहनांवर अप्रशिक्षित चालक काम करीत असतात. याकडे प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक नियंत्रण पोलीस विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. अशी टीका ही स्थानिकांनाकडून होत आहे.