ISRO : जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी निघाले इस्त्रोकडे!

0


मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅनसन यांची हिरवी झेंडी..

CHANDRAPUR । 25 April 2023
चंद्रपूर जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी इस्त्रो (बंगलोर) ISRO येथे दि. २५ एप्रिल ते दि. २९ एप्रिल या कालावधीत शैक्षणिक अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला आहे.


या दौऱ्यात जिल्हा परिषद शाळेतील ३२ विद्यार्थ्यांचा समावेश असून आज सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅनसन यांच्या हस्ते दौऱ्यासाठी निघालेल्या बसला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. 


इस्त्रो दौरा करीता जाण्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी जाॅनसन यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपले योग्य ध्येय ठरवावे भविष्यात अनेकांनी संशोधक व चिकित्सक व्हावे. केवळ परीक्षेतच चांगले गुण मिळाले पाहिजे असा अट्टाहास न करता एक चांगला माणूस म्हणून आपल्याला कसे जीवन जगता येईल, या दृष्टीने प्रयत्नशील असावे असा सल्ला त्यांनी मार्गदर्शनात दिला. सर्वांनी इस्त्रो प्रवासाचा आनंद घ्यावा व सोबतच आरोग्य सांभाळावा अशा सदिच्छा याप्रसंगी बोलताना सीइओ जाॅनसन यांनी विद्यार्थी व सोबत जाणाऱ्या शिक्षकांना दिल्या.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) कपिलनाथ कलोडे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी अशोक मातकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री.हिरुडकर उपस्थित होते.
या इस्त्रो दौर्‍याचे नियोजन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. दीपेंद्र लोखंडे यांनी केले.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !