GUNJEWAHI । 30 MARCH 2023.
सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही (कोठा ) येथे दिनांक 30, 31मार्च व 01एप्रिल 2023 ला भोई (ढिवर) समाज वाल्मिकी मंदिर, गुंजेवाही च्या वतीने श्री महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उदघाट्क श्री. विजयभाऊ वड्डेटीवार माजी मंत्री तथा आमदार ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र, सहउदघाट्क श्री वीरेंद्रकिशोर जयस्वाल माजी अध्यक्ष तथा उपसभापती पं. स. सिंदेवाही, अध्यक्ष श्री रमाकांत लोधे जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर,उपाध्यक्ष श्री राहुल पोरेड्डीवार पं. स. सदस्य सिंदेवाही. दिपप्रजवलन प्रा. डॉ. राजेश डहारे सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही, श्री शँकर भैया निषाद मच्ची ठेकेदार नागपूर, श्री नीताई मच्ची ठेकेदार चंद्रपूर, चंद्रशेखर सावकार चन्नावार, मनोज सावकार चन्नावार. प्रमुख पाहुणे सरपंच वसंत टेकाम, उपसरपंच शालिनीताई गुरनुले, सौ. रुपाताई सुरपाम जिल्हा परिषद चंद्रपूर, सौ. मीनाक्षी मेश्राम नगरसेवका सिंदेवाही, शोहेब भैया जी. एम. कंपनी गुंजेवाही, शादिक शेख, पुणेश गांडलेवार, सौ. वदंना चन्नावार पोलीस पाटील, सौ. शोभा भेंडारे पोलीस पाटील, यशवंत सा. गुनशेट्टीवार, गंडाटे साहेब, नागापुरे तलाठी, ग्रामविकास अधिकारी, गोकुल वाडगुरे सर, सुरपाम सर, ललिता राज कोसमशिले, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा होणार आहे.
या कार्यक्रम सोहळ्यात गुरुवारला ग्रामसफाई, घटस्थापना व होमयज्ञ पूजा, हळदीकुंकू व रांगोळी स्पर्धा आणि सामान्य ज्ञान स्पर्धा. शुक्रवारला महर्षी वाल्मिकी ऋषी पालखीची मिरवणूक, रात्रौला सांस्कृतिक कार्यक्रम तशेच याच कार्यक्रमाचे औचीत्य साधून शनिवारला चि. सौ. कां. रविता सौ. सुरेखा व श्री सुरेश सोनकर यांची कनिष्ठ कन्या मु. पो. गुंजेवाही, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर आणि चि. राजू सौ. अर्चना व श्री रामदास शेरकी यांचे जेष्ठ चिरंजीव मु. पो. पेंढरी, ता.सिंदेवाही, जि. चंद्रपूर यांचा शुभ विवाह आयोजित केला आहे. या श्री. वाल्मिकी ऋषी समितीचे अध्यक्ष श्रीमती प्रेमीला किसन मेश्राम, उपाध्यक्ष रवींद्र सोनकर, सचिव सचिन सोनकर, सहसचिव पंकज सोनकर, कोषाध्यक्ष धनराज सोनकर, गोकुल सोनकर समस्त सदस्य तथा आयोजक संपूर्ण ढिवर समाज गुंजेवाही (कोठा ) यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.