Mul : शहिद बाबूराव शेडमाके स्मरणार्थ सहकारी पतसंस्थेचा शुभारंभ.

0


जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत, राज्य पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष महेश पानसे यांचे उपस्थितीत उद्घाटन..

CHNDRAPUR । 13 MARCH 2023
मूल तालुक्यातील (Mul-Maroda) मारोडा येथे शेतकरी, शेतमजूर, महिला व उद्योजक यांचा आर्थिक व्यवहार सुखकर करण्याच्या दृष्टीने तसेच बचत गटांना अधिकाधिक लाभ मिळवून स्वयंपूर्ण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शहिद वीर बाबूराव शेडमाके (Baburao Shedmake) यांच्या जयंतीचे शुभपर्वावर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.चे उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे हस्ते आणि प्रा. महेश पानसे यांचे विशेष उपस्थितीत संपन्न झाले. 


या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश जगताप यांनी केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारोडाचे सरपंच भिकारूजी शेंडे हे उपस्थित होते.
या उद्घाटन कार्यक्रमा निमित्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी विविध योजना शेकडो उपस्थित महिला व शेतकरी, शेतमजूर यांना समजावून सांगत जिल्हा बँकेतर्फे (Chandrapur District Central Co Operative Bank) १ लक्ष रूपयांचे खाते देण्याची घोषणा केली. राज्य पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांनी पतसंस्थेची उपयुक्तता व संचालक मंडळ व ग्राहकांची जबाबदारी यावर प्रकाश टाकला. 


याप्रसंगी काटवण चे सरपंचा वंदनाताई पेंदोर, सदस्य किशोर गभणे,ग्रा.प.सदस्या मिनाक्षी मुरस्कर,अरूणा दुपारे उपस्थित होते. संचालक मंडळाचे अध्यक्ष रविशंकर उईके, उपाध्यक्ष अविनाश जगताप,सचिव नंदादीप मडावी, संचालक लोकनाथ नर्मलवार,विनोद शेटे,संतोष सोनवाणे,यशवंत मरसकोल्हे, देवराव हणवते , सत्यशाही वल्के,रमेश मुरस्कर, शिल्पा उईके,वैभव घाटे आदींची उपस्थिती होती. 
पार पडलेल्या कार्यक्रमाचे संचालन शिल्पा उईके यांनी तर आभार सत्यशाही वलके यांनी मानले. 
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !