विदर्भातील काही भागांत पुन्हा दिसले Star Link उपग्रह..

0

सॅटेलाईट पार्ट पडल्याची घटना ताजी असतानाच, नागरीकांमध्ये भिती!


Chandrapur। 03 February 2023
काल (दि. ०२ फेब्रु.) सायंकाळी सात-साडेसात वाजताच्या सुमारास विदर्भातील अनेक शहरांमध्ये आकाशातून उपग्रहांची रेषीय माळ (Star Link) जातांना दिसली.


परंतू याआधी चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये विशेषतः सिंदेवाही तालुक्यात लाडबोरी येथे आकाशातून मोठी लोखंडी कळी व अनेक भागांत गोळे पडल्याची घटना ताजी असतानाच असे अचानक आकाशात काही तरी दिसणे ग्रामीण भागातील नागरिकांना भितीदायक आहे.
परंतु नागरिकांना घाबरून जाण्याचे कारण नाही.
कारण स्टार लिंक हा स्पेस एक्सद्वारे संचालित इंटरनेट उपग्रहांचा समूह आहे. जो सध्या 47 देशांना उपग्रह इंटरनेट सेवा प्रदान करतो. स्पेस एक्स ही ईलाॅन मस्क (Elon musk) यांची खाजगी इंटरनेट कंपनी असून या संस्थेने 2019 मध्ये स्टार लिंक उपग्रह प्रक्षेपित करण्यास सुरुवात केली. डिसेंबर 2022 पर्यंत स्टार लिंक मध्ये पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 3300 पेक्षा जास्त वस्तुमान निर्मित लहान उपग्रहांचा समावेश आहे.




इलाॅन रिव्ह मस्क हा एक 51 वर्षीय कॅनडियन /अमेरिकन व्यावसायिक आहे. हा टेसला मोटर्स ह्या अमेरिकन कंपनीचा संस्थापक व मुख्याधिकारी आहे. तसेच स्पेस एक्स आणि सोलर सिटी या कंपन्यांचे अधिकारी श्रेणीचे कार्यभार सांभाळतो.
त्याचे लवकरच जागतिक स्तरांवर मोबाईल सेवा देण्याचे उद्दिष्ट आहे.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !