आमदार वडेट्टीवारांनी “त्या” शिक्षकांना धरले धारेवर.. #Bramhapuri

0

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची आमदारकडून दखल!


BRAMHAPURI। 04 Feb 2023
ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसंबी येथील जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सततच्या गैरहजेरीसह गैरवर्तनाबद्दल संताप व्यक्त करून बंड पुकारल्याचा व्हिडिओ अलिकडेच सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला. त्या व्हायरल व्हिडिओची गंभीर दखल घेत राज्याचे माजी मंत्री तथा स्थानिक आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी आज या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रसंगीच आमदार वडेट्टीवारांनी त्या गैरवर्तणुक करणाऱ्या शिक्षकांना चांगलेच धारेवर धरले.


ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसंबी (खड) येथे इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंत जि. प. उच्च प्राथमिक शाळा असुन येथे ५ शिक्षक कार्यरत आहेत. मात्र हे शिक्षक मुख्यालयी राहात नसून ब्रम्हपुरी वरून ये-जा करतात. त्यामुळे शिक्षक वेळेवर नाही. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर होतो आहे. शिक्षकांच्या नेहमीच्याचं उशीरा येण्याने अनेक विषयाच्या तासिका होत नाही. त्यामुळे त्रासलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सदोष कार्यप्रणालीवर ठपका ठेवत गावातून प्रभात फेरी काढत आगळे -वेगळे आंदोलन केले. त्याचा व्हिडिओ (Video) समाज माध्यमांत चांगलाच व्हायरल झाला.




सदर आंदोलनाची गंभीर दखल घेत राज्याचे माजी मंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी गटविकास अधिकारी पुरी यांचेसह शाळेला अचानक भेट देऊन प्रत्येक वर्गात जात विद्यार्थ्यांना विचारपूस करीत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याचवेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचीही त्यांनी चाचपणी केली. त्यामध्ये शिक्षकांच्या लेटलतीफीगीरीमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम दिसून आला.



त्यामुळे तापलेल्या आमदार वडेट्टीवारांनी सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती व गावकरी यांच्या समोरच शिक्षकांना चांगलेच धारेवर धरले. तर मुख्यालयी न राहता कर्तव्यात कसूर करणाऱ्या शिक्षकांचे घरभाडे भत्ता अदा न करण्याचे आदेश देत पुढील महिनाभरात शैक्षणिक गुणवत्ता दर्जात वाढ व विद्यार्थ्यांची प्रगती याबाबत गांभीर्याने न घेतल्यास शिक्षणमंत्र्याकडे तक्रार करून कठोर कारवाई करणार असल्याची तंबी त्यांनी शिक्षकांना दिली.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !