अडबालेंच्या विजयाचा ब्रम्हपुरी मतदार संघात कॉंग्रेसकडून जल्लोष..

0


पदवीधर शिक्षक निवडणूक - आमदार विजय वडेट्टीवार वडेट्टीवार यांची उपस्थिती..

चंद्रपूर, दि. 02 जानेवारी 2023
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर शिक्षक मतदार संघाच्या (graduate teacher constituency) निवडणूकीचा निकाल आज जाहिर झाला.
यामध्ये भाजपा समर्थित उमेदवार नागो गाणार यांना शह देत महाविकास आघाडी समर्थित उमेदवार सुधाकर अडबाले यांनी घवघवीत विजय मिळविला.




नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात सुधाकर अडबाले यांनी भाजपा समर्थित उमेदवार नागो गाणार यांचा विक्रमी मताधिक्याने पराभव करीत विजयश्री खेचून आणला. याचाचं जल्लोष म्हणुन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्रम्हपुरी मतदार संघातील ब्रम्हपुरी, सिंदेवाही,सावली येथील काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात शिक्षक मतदार यांचे वतीने पेढे वाटून तसेच फटाक्याची प्रचंड आतीषबाजी करून घोषणाबाजी करतं विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.



संपुर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या अगदी प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या शिक्षक मतदार संघ निवडणुकीचा निकाल आज जाहिर झाला. यामध्ये महाविकास आघाडीने 3 जागेवर विजश्री मिळवून भाजपा समर्थित उमेदवारांना शह दिला. तर एका जागेवर अपक्ष असे पक्षीय बलाबल पुढे आले आहे.
तत्पूर्वी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ यामध्ये भाजपचे पारडे जड मानल्या जात होते.या मतदार संघाची धुरा राज्याचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार व सुनील केदार यांनी हाती घेत महाविकास आघाडीचे समर्थन देण्यासाठी योग्य चाचपणी सुरू केली. यात शिक्षकांच्या समस्यांना घेऊन वेळोवेळी आंदोलन करणारे सुधाकर अडबाले यांची निवड करून निवडणुकीत चुरस निर्माण केली.मात्र माजी मंत्री वडेट्टीवार व सुनील केदार यांनी कंबर कसून शिक्षकांचे वेळोवेळी मेळावे घेऊन शिक्षक मतदार संघात अहोरात्र मेहनत घेतली. याचेच आज पडसाद म्हणुन भाजपा समर्थित उमेदवार नागो गाणार यांचा विक्रमी मताधिक्याने पराभव करीत महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले (Sudhakar Adbale) यांनी विजयश्री संपादन केला. यामुळे ग्रामीण भागातील शिक्षक मतदार यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तर आज निवडणुकीचा निकाल लागताच राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आमदार विजय वडेट्टीवार हे ब्रम्हपुरी मतदार संघात जनसंपर्क दौऱ्यात असताना शिक्षक मतदार व संघटना पदाधिकारी यांनी त्याची ब्रम्हपुरी येथील जनसंपर्क कार्यालय येथे भेट घेत पेढे भरवून फटाक्यांची आतिषबाजी करतं विजयी घोषणा देत, जल्लोष साजरा केला. तर ब्रम्हपुरी मतदार संघातील सिंदेवाही व सावली येथेही विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. शिक्षक मतदार संघाचे नवनियुक्त आमदार सुधाकर अडबाले यांच्या विजयात मोलाचा वाटा असणारे राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा आ. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या पुढाकारातून हा विजय मिळवला असल्याने त्यांच्याही नावाच्या घोषणा देत अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. यावेळी ब्रम्हपुरी काँग्रेसचे पदाधिकारी, शिक्षक मतदार व बहूसंख्य नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !