💰देशवासियांना मोदी सरकारचं New Year Gift!
♻ रास्तभाव दुकानदार विचारणार पैसे, तर दाखवा GR...📄
चंद्रपूर, दि. ११ जानेवारी २०२३.
हे जनतेचे सरकार आहे. असे म्हणवून घेणार्या मोदी सरकारने नववर्षाच्या सुरवातीलाचं देशातील गोरगरीब जनतेला आश्चर्याचा सुखद धक्का देत दि. ०१ जानेवारी पासून दि. ३१ जानेवारी २०२३ पर्यंत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत देण्यात येत असलेल्या राशनचे मोफत वितरण करण्यात येईल असे जाहीर केले आहे.
नुकतेच तसे शासननिर्णय देखील राज्यांना प्राप्त झाले आहेत.
मोदी सरकारच्या या निर्णयाचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार असून नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
या आधी कोरोणा काळातही मोदी सरकारने असा निर्णय घेतला होता.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत नागरिकांना ३ रू. प्रतिकिलो च्या दराने तांदूळ, २ रू. प्रतिकिलो च्या दराने गहू आणि १ रू. प्रतिकिलो च्या दराने भरडधान्य उपलब्ध करून देण्यात येत होते. तथापि राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारने १ जानेवारी २०२३ पासून दि. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत आता मोफत अन्नधान्य (राशन) वितरित करण्याच्या सूचना केंद्र सरकारने संबंधिताना पाठविलेल्या पत्रात केल्या आहेत.
>