नगराध्यक्ष अनिल धानोरकरांनी दाखवली हिरवी झेंडी..
भद्रावती, दि. ०९ जानेवारी २०२३.
भद्रावती मतदार संघाच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या वाढदिवसा निमित्य भद्रावती येथे मॅरॅथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भद्रावती शहराचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी हिरवी झेंडी दाखवून मॅरॅथॉन स्पर्धेची सुरुवात केली.
हि स्पर्धा भद्रावती येथील मा. बाळासाहेब ठाकरे प्रवेश द्वार ते गणेशमंदिर पर्यंत होती. यावेळी शेकडो युवती व युवकांनी सहभाग नोंदविला. यावेळी पुरुष गट प्रथम पुरस्कार दिपक प्रसाद, द्वितीय पुरस्कार सुजल वाढई, तृतीय पुरस्कार आकाश राऊत, प्रोत्साहनपर बक्षीस प्रवीण लांडे, वंश दिवसे, सुमित श्रीवास्तव, ऋतिक धोडरे,ओम ढवळे तर महिला गट प्रथम पुरस्कार आचल कडूकर, द्वितीय पुरस्कार गौरी नन्नावरे, तृतीय पुरस्कार वैशाली मालेकर, प्रोत्साहन बक्षीस वैष्णवी नैताम, गायधनी, प्रणाली चौधरी, पुनम आस्कर,निखिता बोधाने यांनी पटकाविले. याप्रसंगी मंचावर खासदार बाळुभाऊ धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर, न. प.भद्रावती नगराध्यक्ष अनिल धानोरकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सतिश वारजुरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दिनेश चोखारे, भद्रावती तालुका काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष प्रशांत काळे, भद्रावती काँग्रेस शहर अध्यक्ष सुरज गावंडे, प्रमोद नागोसे ,प्रशांत झाडे, अब्बास अजानी, चंदु खारकर, प्रवीण महाजन, महेंद्र माणूसमारे, हनुमान घोटेकर, निखिल राऊत यांची उपस्थिती होती.