चंद्रपूरच्या आजी-माजी जिल्हाधिकाऱ्यांसह अनेकांची होणार चौकशी..

0
💥Big Breaking..!!


♻️विनोद खोब्रागडे ह्यांच्या याचिकेवर वरोरा विशेष न्यायालयाचे ठाणेदारांना चौकशीचे आदेश!


चंद्रपूर, दि. ११ जानेवारी २०२३.
वरोरा येथील श्री. विनोद खोब्रागडे यांनी मा. विशेष न्यायालय वरोरा यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार मा. न्यायालयाने चंद्रपूरचे आजी-माजी जिल्हाधिकारी तसेच तत्कालीन तहसीलदार व इतर संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये सि.आर.पि.सी. कलम २०२ नुसार चौकशी करण्याचे आदेश भद्रावती व वरोरा पोलिसांना दिले आहेत. 
त्यानुसार सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून न्यायालयाला अहवाल सादर करण्याचे निर्देश मा. विशेष न्यायालय वरोरा यांनी दिले आहेत.फिर्यादी विनोद खोब्रागडे यांनी चंद्रपूरचे विद्यमान जिल्हाधिकारी विनय गौडा जि.सी. यांचेसह तत्कालीन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, उपायुक्त गोसेखुर्द घनश्याम भुगावकर, उपायुक्त मनरेगा शंतून गोयल, रोहन घुगे, नागपूर विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिद्री, मंत्रालय कक्ष अधिकारी रविकिरण गोवेकर, भद्रावतीचे ठाणेदार गोपाल भारती, तहसीलदार अनीकेत सोनवणे, मे. कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन कंपनी लि. बेंगलोर, मे. कर्नाटक एम्टा कोलमाईन्स लि. बेंगलोर, तहसीलदार वरोरा श्रीमती रोशन मकवाने,  प्रशांत बेडसे, मोहोळ, मुख्याधिकारी अजीत पवार बिड, श्री. उपायुक्त मिलींदकुमार साळवे या सर्वांच्या विरोधात मा. विशेष न्यायालयाने ॲट्रॉसिटी ॲक्ट कलम ४, ३ (१) (ग) (छ) (क), (ख), (थ) (त) (द) व भादंवि कलम १२० (ब). ४२०, ४३१, ४६८, ४६४, ४७०, ४७१ व ३४ नूसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी पिटीशनद्वारे केली होती. उक्त व्यक्तींनी नैसर्गिक न्यायतत्त्वाचे उल्लंघन केले असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली आहे. कायद्याचा दुरूपयोग करणे, पदाचा व अधिकाराचा गैरवापर करणे, पेसा कायद्याचा गैरवापर करणे, फिर्यादीचे इच्छेविरूध्द काम केले असून आदिवासींच्या जमिनीचे बेकायदेशिर ताबे घेतलेले आहेत. राष्ट्रीय संपत्तीची मोठ्या प्रमाणात चोरी केली आहे. आदिवासी व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची फसवणुक केलेली आहे. पर्यावरणाची हानी केलेली आहे. काल्पनिक व खोटी माहिती वरिष्ठांना दिलेली आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ घेतलेला आहे, आदिवासींच्या जमिनीची तालुका बदलवून रजिस्ट्री केलेली आहे. कटकारस्थान व संनगमत करून आदिवासींना मालकी हक्कापासून वंचित केलेले आहे. असा विनोद खोब्रागडे दावा केला असून हे सर्व फिर्यादीने उघडकीस आणल्यामुळे फिर्यादीला मनस्ताप देवून पिस्तुलसह जिवंत मारण्याची धमकी दिली व समाजात प्रतिष्ठा मलिन केल्याचा आरोप विनोद खोब्रागडे यांनी केला व संपूर्ण दस्तऐवज पुराव्यासह आरोपीवर कार्यवाहीसाठी विशेष जिल्हा व सत्र  न्यायालयाकडे पिटीशन दाखल केली होती.न्यायालयाने दाखल तक्रारीवर साक्षी पुरावे तपासून भद्रावती व वरोरा ठाणेदार यांना सदर प्रकारांची सखोल चौकशी करून दि. ४ मार्च २०२३ पर्यंत अहवाल सादर करण्याचे निशानी कं. १ वर आदेश निर्गमित केल्याची माहिती फिर्यादी विनोद खोब्रागडे यांनी चंद्रपूरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !