चंद्रपूरच्या एसपींनी पटकावले सुवर्णपदक!

0
३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धेचे पुण्यात आयोजन...

चंद्रपूर, दि. १४ जानेवारी २०२३
महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी- कर्मचार्‍यांमधिल क्रीडा कौशल्याला वाव मिळावा तसेच पोलिसांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांचे मनोबल वाढावे यासाठी पुणे येथे ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 


या स्पर्धेमध्ये राज्यातल्या ३२०० पोलीसांनी एकूण १८ क्रीडा प्रकारात फार चुरशीने आणि खिलाडू वृत्तीने सहभाग घेतला होता. 
या स्पर्धेमधून चंद्रपूर जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी आली असून जिल्ह्याचा कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे. असे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक रविन्द्रसिंह संतोषसिंह परदेशी यांनी या स्पर्धेमधील “पिस्टल फायरिंग मध्ये ग्रुप इन” या प्रकारात सुवर्ण पदक पटकाविले. 
राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांचे हस्ते त्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. 



आपल्या दैनंदिन कर्तव्यात पोलिसांना अनेकदा ताणतणावाचा सामना करावा लागतो त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन होणे महत्वाचे असून पोलीस दलातील क्रिडापटूंसाठी देखील अशा स्पर्धा उपयुक्त ठरतात. यामुळे त्यांना राष्ट्रीय स्पर्धेतही कौशल्य दाखविण्याची संधी मिळते. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी पदके मिळवतात, देशाचे नाव मोठे करण्याचे काम करतात. अशा खेळाडूंना वाव देण्यासाठीही या स्पर्धांना महत्व आहे.




जिल्हा पोलीस अधीक्षक रविन्द्रसिंह परदेशी यांचे “चांदा न्यूज”च्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन! 💐💐




Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !