जिल्हा परिषद शाळा लाडबोरी येथे केंद्रीय नवरत्न स्पर्धेचे आयोजन...

0

सिंदेवाही, दि.12 जानेवारी २०२३.
 सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या वतीने केंद्रीय तालुकास्तरीय नवरत्न स्पर्धेचे दि. 11 जानेवारी 2023 ला आयोजन करण्यात आले होते.
 
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डी. आर बावनकर (शि.वि.अ.) हे होते. विशेष अतिथी म्हणून सरपंच ममता चहांदे ,व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ .जोशना कारमेंगे ही आवर्जून उपस्थित होत्या.
पाहुण्यांच्या स्वागत करण्याकरिता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लाडबोरी मधील विध्यार्थी मुलींनी सदाबहार नृत्य करून पाहुण्याचे स्वागत केले. यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरवात झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय शिक्षिका राजश्री वसाके यांनी केले. 
कार्यक्रमाचे प्रास्तवीक सन्मा.श्री सी एफ आवळे सर यांनी केले, या कार्यक्रमामध्ये
केंद्र स्तरावर निवड झालेल्या विध्यार्थीच्या स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये 1) बुद्धिमत्ता चाचणी, 2) सुंदर हस्ताक्षर 3) वाद विवाद स्पर्धा 4) स्वयंपूर्ण भाषण स्पर्धा 5) कथाकथन स्पर्धा 6) एकपात्री भूमिका अभिनय स्पर्धा 7) स्वयंपूर्ण लेखन स्पर्धा 8) स्मरण शक्ती स्पर्धा 9) चित्रकला स्पर्धा या स्पर्धा घेण्यात आल्या, शाळेच्या वतीने संपूर्ण कार्यक्रम योग्य व यशस्वी रित्या पार पडण्यात आला. या स्पर्धांमधील प्रथम व द्वितीय क्रमांक पटकविणाऱ्या विध्यार्थी व विध्यार्थिनीचा ट्राफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार मुख्याध्यापक रमेश जांभुळकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक म्हणून शाळेतील सहाय्य्क शिक्षक गुरुनुले सर, राहानगंडले सर, ठाकरे मॅडम यांनी परिश्रम घेतले. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !