नगर स्वच्छ्ता अभियानाने ब्रम्हपुरी महोत्सवास प्रारंभ..

0

माजी मंत्री आमदार वडेट्टीवारांच्या संकल्पनेतून ब्रम्हपुरी महोत्सव - 2023

ब्रम्हपुरी, दि.12 जानेवारी २०२३
मागील दोन वर्षांपासून कोरोणा या वैश्विक महामारी मुळे ब्रह्मपुरी महोत्सव आयोजनात विरजण पडले होते. मात्र यंदाचे वर्षी नववर्षाच्या प्रारंभात राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, ब्रह्मपुरी क्षेत्र आ. विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरीवासीयांचा आनंद द्विगणित करण्यासाठी सांस्कृतिक, क्रीडा, कृषी तसेच स्थानिक पातळीवरील खेळाडू , व कलावंतांच्या सुप्त गुणांना वाव देणे हेतू पुनश्च ब्रह्मपुरी महोत्सव 2023 चे आयोजन केले.चार दिवसीय ब्रह्मपुरी महोत्सवाची आज दि.12 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या थोर विचारातून नगर स्वच्छता अभियानाने सुरुवात करण्यात आली. आयोजित नगर स्वच्छता अभियाना राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आ. विजय वडेट्टीवार, नगराध्यक्ष रिता उराडे, उपनगराध्यक्ष अशोक रामटेके,तालुकाध्यक्ष खेमराज तिडके, शहराध्यक्ष बाळाभाऊ राऊत,महिला तालुका अध्यक्ष मंगला लोणबले, सभापती विलास विखार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक प्रभाकर सेलोकर, किसान सेलचे नानाजी तुपट,माजी जी. प. सदस्य प्रमोद चिमुरकर,स्मिता पारधी, माजी प. स. सदस्य थानेश्र्वर कायरकर, शहराध्यक्ष योगिता आमले, तथा नगरपरिषदेचे सर्व पदाधिकारी, तथा शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक, ब्रह्मपुरी महोत्सवाचे सर्व समिती पदाधिकारी सदस्य, तथा इतर गण मान्य उपस्थित होते. याप्रसंगी शहरातील ख्रिस्तानंद चौकापासून ते संपूर्ण शहरातून स्वच्छता करीत जनजागृतीचा संदेश देत शहर स्वच्छता अभियान राबविले. आयोजित या स्वच्छता अभियानात ब्रह्मपुरी नगरातील तसेच परिसरातील सर्व शाळा, कॉलेज, महाविद्यालीन विद्यार्थी प्राध्यापक वृंद, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, शेकडो कार्यकर्ते, नागरीक यांनी सहभाग नोंदविला.


#BramhapuriMohotsav #2023

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !