वरोरा झाडीबोली साहित्य मंडळाच्या वर्धापनदिनी काव्यसंग्रह लोकार्पण व पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन...

0

वरोरा, दि.१२ जानेवारी 2023.
झाडीबोली साहित्य मंडळ वरोरा द्वारा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दि.१४ जानेवारी २०२३ रोज शनिवारला ठिक ११.३०वा.संस्थेचा २३ वा वर्धापन दिन तसेच कवी पंडीत लोंढे संपादीत "भेट अभंगाची" या अभंग काव्य संग्रहाचे लोकार्पण तसेच प्रसिद्ध साहित्यिक ना.गो.थुटे यांच्या "गुणगान" या पुस्तकाचे प्रकाशन स्थानिक कर्मविर विद्यालय वरोरा येथे होत आहे.



ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान.सुधाकरजी कडू विश्वस्त आनंदवन वरोरा,मा.डाँ.सुधिर मोते जेष्ठ साहित्यिक, भद्रावती,मान.रत्नमालाताई भोयर साहित्यिक मुल,मान.ना.गो.थुटे प्रसिध्य साहित्यिक,वरोरा,मा.नरेंद्र बोरीकर मु.अ.कर्मविर विद्यालय,वरोरा हे प्रमुख अतिथी असणार असून या संमेलनात मा.लक्षमणराव गमे नवनियुक्त सर्वाधिकारी गुरुकुंज आश्रम मोझरी व मा.संजू श्रावण जांभुळे जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त यांच्या सत्काराचे आयोजन केलेले आहे. दुस-या सत्रात निमंत्रीतांचे कविसंमेलन होत आहे त्यात अध्यक्ष म्हणुन मा.प्रविण आडेकर भद्रावती,तर प्रमुख मान्यवर म्हणुन संस्थेचे अध्यक्ष मा.पंडीत लोंढे,वरोरा,मा.विनायक धानोरकर गडचिरोली, मा.चंद्रशेखर कानकाटे,सचिव हे राहणार असून जिल्ह्यातील निवडक नामवंत कवी निमंत्रीत कवी म्हणुन आपल्या कविता सादर करणार आहे. संस्थेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.करिता या बहारदार साहित्य संमेलनास साहित्य क्षेत्रातील रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून आपल्या रसिकतेला संधीत परिवर्तीत करण्याचे आवाहन झाडीबोली साहित्य मंडळ वरोरा कडून करण्यात येत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !