राजुरा वनपरिक्षेत्रात महिनाभरात दुसरी दुर्घटना!
🌳वनविभागाविरोधात नागरीक संतप्त!
राजूरा, दि. ०३ डिसेंबर २०२२.
तालुक्यातील आनंदगुडा (लक्कडकोट) परीसरात राहणाऱ्या शेतकऱ्याला आज सायंकाळच्या सुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने ठार केले.
मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव जंगु मारु कुरसंगे (५८) असून त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वनविभागाला पाचारण करण्यात आले आहे.
मागिल महिण्यात ०६ नोव्हेंबर रोजी तालुक्यातीलच तुम्मागुडा (सुब्बई) भागातील शेतकर्यास बिबट्याने ठार केले होते. महिन्याभरातच परिसरात दूसरी घटना घडल्याने नागरीकांमध्ये वनविभागाविरोधात प्रचंड आक्रोश पहायला मिळत आहे.