सिंदेवाही तहसील कार्यालयाच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नवमतदार नोंदणी जनजागृती कार्यक्रम.

0
सिंदेवाही, दि. ०३ डिसेंबर २०२२.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही तथा तहसील कार्यालय सिंदेवाही यांच्या संयुक्त विद्यमाने  आज दि. 3 डिसेंबर शनिवारला सकाळी 9-00 वाजता नवीन मतदार जागृती शिबिर सर्वोदय  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. याठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये नायब तहसीलदार दत्तात्रय धात्रक, प्राचार्य नागलवाडे, प्रा. रिजवान शेख हे उपस्थित होते. 
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नायब तहसीलदार धात्रक म्हणाले की, प्रत्येक नागरिकाने लोकशाहीच्या विकासाकरिता व देशाच्या प्रगतीकरिता देशहीत जपत आपले कर्तव्य करण्याकरिता तत्पर असावे. देशहीत साधले तर व्यक्तीगत हित नक्कीच साधले जाते. तेव्हा भारतीय संविधानाच्या आधारे मिळालेल्या मतदानाचा उपयोग सकारात्मक दृष्टीने व्हावा याकरिता शासन व प्रशासन स्तरावरुन नाना तऱ्हेने नाना प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे नवमतदारांनी नोंदणी करून घ्यावी. 
नवीन मतदार जागृती शिबीर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिजवान शेख सर यांनी केले तर आभार प्रदर्शन रनदीवे सर यांनी केले.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !