चंद्रपूर, दि. ०४ डिसेंबर २०२२.
केंद्राच्या इतर मागासवर्ग प्रवर्ग जातींच्या यादीत कापेवार जातीचा समावेश करण्यात यावा अशी मागणी भाजयुमो चंद्रपूर महानगर जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश कोलावार यांनी केली आहे.याबाबतचे निवेदन नवनियुक्त राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष हंसराज अहीर यांच्याकडे सोपविण्यात आले.
सदर निवेदनातून कोलावार म्हणाले की,
कापेवार ही जात सध्यास्थितीत महाराष्ट्रातील एन.टी 'बी' या प्रवर्गात येते (या अगोदर ओबीसी,एसबीसी या वर्गात येत होता).माञ केंद्रीय स्तरावर ही जात इतर मागासवर्ग या प्रवर्गात येत असून अजूनपर्यंत या जातीचा केंद्राच्या यादीत समावेश केला गेलेला नाही. यामुळे केंद्रीय जातीचा दाखला मिळण्याकरिता अर्ज दाखल केला असता अर्ज नामंजूर होतो.याबाबत प्रशासनास माहिती विचारल्यास सदर जातीचा केंद्र स्तरावर नोंदणी नसल्याकारणांनी दाखला मिळत नसल्याचे सांगितल्या जाते.
याबाबत माहिती काढल्यास असे समजते की महाराष्ट्राच्या केंद्रीय मागासवर्ग यादीत २४७ क्रंमांकावर मुन्नूरवार,मुन्नूर,तेलगु मुन्नुर,तेलगु कापेवार इत्यादी नावाने या जातीचा समावेश आहे.माञ सदर यादीत कापेवार या नावाने जातीचा समावेश नाही.तेलगु कापेवार ही जात महाराष्ट्र शासनाच्या जातीच्या दाखल्यात फक्त कापेवार या नावांनी लिहिला गेला अाहे. तर माहितीनुसार या जातीचा अभ्यास केल्यास विविध राज्यात या जातीचा समावेश त्या-त्या राज्याच्या राज्यभाषेचा उच्चारानुसार, शब्दानुसार नोंदणी केली गेली आहे. उदा.तमीलनाडूमध्ये नायगण, छत्तीसगडमध्ये कुंभी,महाराष्ट्रात कुणबी तथा मराठी कापेवार,कापेवार,आंध्रप्रदेशमध्ये व तेलंगानामध्ये कापू अर्थात कुणबी या नावांनी समावेश आहे.जरी या जातीचा नावाचा शब्द अर्थात त्या-त्या राज्यात नोंदणींचा समावेश अलग-अलग असले तरी सदर जात ही एकच अाहे.यामुळे केंद्र स्तरावर अर्ज केल्यास अर्ज नामंजूर होत असल्याने केंद्रीय स्तरावरच्या नोकरपदभरतीत कापेवार समाजाला आरक्षणाचा लाभ मिळत नसल्याने या समाजावर अन्याय होत आहे.तरी केंद्राच्या इतर मागासवर्ग प्रवर्ग जातीच्या यादीत कापेवार जातीचा समावेश करण्यात यावा अशी मागणी महेश कोलावार यांनी यावेळी केली.