ब्रम्‍हपूरी वनविभागातील ६२ गावांसाठी १५ कोटी ५० लक्ष रू. निधी वितरीत.

0
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या निर्देशानुसार शासन निर्णय निर्गमित.

मानव-वन्‍यजीव संघर्ष कमी करण्‍याच्‍या दृष्‍टीने होणार उपाययोजना.

चंद्रपूर, दि. ०२ डिसेंबर २०२२
ब्रम्‍हपूरी वनविभागातील मानव-वन्‍यजीव संघर्ष कमी करण्‍याच्‍या दृष्‍टीने संवेदनशील असलेल्‍या एकूण ६२ गावांकरिता डॉ श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत १५ कोटी ५० लक्ष रू. निधी मंजूर करण्‍यात आलेला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या निर्देशानुसार सदर ६२ गावांकरिता प्रत्‍येकी २५ लक्ष रू. याप्रमाणे १५ कोटी ५० लक्ष रू. निधी दिनांक १ डिसेंबर २०२२ च्‍या शासन निर्णयानुसार वितरीत करण्‍यात आला आहे.

ब्रम्‍हपूरी वनविभागाचे क्षेत्र वनबहुल असून ताडोबा अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍प या संरक्षीत क्षेत्राच्‍या लगत असल्‍याने तसेच ब्रम्‍हपूरी वनविभागाचे कार्यक्षेत्र डिस्‍पर्सल क्षेत्रात मोडत असल्‍याने सदर क्षेत्र हे वन व वन्‍यजीवांच्‍या बाबतीत अतिशय समृध्‍द आहे. सदर क्षेत्रात मोठया प्रमाणावर गावे वनालगत वसलेली असल्‍याने सातत्‍याने ब्रम्‍हपूरी वनविभागात मानव-वन्‍यप्राणी संघर्षाच्‍या घटना घडत आहेत. यामध्‍ये मनुष्‍यहानी, मनुष्‍य जखमी, पशुधन हानी, पशुधन जखमी, शेतपीक नुकसानाची प्रकरणे मोठया प्रमाणावर आहे. परिणामी स्‍थानिक नागरिकांमध्‍ये असंतोष वाढत आहे. मानव-वन्‍यजीव संघर्ष कमी करण्‍याकरिता वनालगतच्‍या गावांमधील लोकांचे वनावरील अवलंबत्‍व कमी करणे आवश्‍यक आहे. याकरिता डॉ श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत गावांची निवड करताना भ्रमण मार्गातील गावांची निवड करण्‍यात आलेली आहे. याबाबत कायमस्‍वरूपी उपाययोजना करण्‍याच्‍या दृष्‍टीने सदर ६२ गावांसाठी प्रती गाव २५ लक्ष रूपये असा एकूण १५ कोटी ५० लक्ष रूपये निधी मंजूर व वितरीत करण्‍यात आला आहे.

या ६२ गावांमध्‍ये ब्रम्‍हपूरी वनविभागाअंतर्गत नागभीड तालुक्‍यातील बनवाही माल, डोंगरगांव, तिवर्ला तूकूम, खडकी, कान्‍पा, विलम, म्‍हसली, बिकली, कसर्ला, कोरंबी, पेंढरी, नवखळा, रेंगातूर, कुनघाडा चक, कोदेपार, वासाळा मक्‍ता, मिंडाळा, कोसंबी गवळी, वासाळा मेंढा, कन्‍हाळगांव, वलनी, सावर्ला, उमरगांव, खरकाडा, राजोली बोंड, पारडी, सोनूर्ली, नवानगर, येनोली कोट, बाळापूर, गोविंदपूर, सोनापूर, येनोली माल,  वैजापूर, कोजबी माल, नांदेड, झाडबोरी, बोडधा, लोहारा, रामपूर, सावरगांव, उपरपेठ तसेच ब्रम्‍हपूरी तालुक्‍यातील मरारमेंढा, दिघोरी, सावरदंड चक, बरडकिन्‍ही, तळोधी खुर्द, रानबोथली, चक बोथली, गवर्ला चक, विकासनगर, कोरेगांव रिठ, रामपुरी, बेलदाटी, मुडझा, आवळगांव, कोसंबी, पवनपार, सायगांव, एकारा, चिकटबोदरा, बोद्रा या गावांचा समावेश आहे.



Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !