राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समिती सिंदेवाहीच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन..

0


सिंदेवाही, दि. २० डिसेंबर २०२२.
राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य तालुका सिंदेवाहीच्या वतीने मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबतचे निवेदन राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समिती तालुका सिंदेवाही चे प्रभारी तालुका अध्यक्ष वहाबभाई सय्यद यांनी शिष्टमंडळासह तहसीलदार सिंदेवाही यांचेमार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.


या निवेदनात, मुस्लिम समाजाच्या परिस्थितीचे अवलोकन करून विविध आयोगाने मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात आपल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केलेले आहे या संदर्भात आघाडी सरकारने 2014 ला अध्यादेशाद्वारे मराठा समाजासोबत मुस्लिम समाजाला ही आरक्षण जाहीर केले होते. विशेष बाब म्हणजे मुस्लिम आरक्षण हे धार्मिक आधारावर नसून संविधानिक चौकटीत असल्याने सन 2014 ला शैक्षणिक आरक्षण न्यायालयाने बहाल करून नोकरी संदर्भात राज्य सरकारला अधिक माहिती पुरवण्याची सूचना दिली.
मुस्लिम समाजाची आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक शेती फारच विदारक आहे. त्यामुळे राज्य सरकारला मुस्लिम आरक्षण निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे यासंदर्भात सरकारच्या धोरणामुळे मुस्लिम समाज अत्यंत विदारक परिस्थितीत पोहोचला आहे. आपण मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन राष्ट्रीय प्रवाहामध्ये येण्यासाठी समाजाची मदत करावी अशी मागणी राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समिती च्या वतीने दिलेल्या निवेदनात केली आहे.
निवेदन देणार्‍या शिष्टमंडळात तालुका सचिव खालिद पठाण, तालुका संघटक गुलाम हुसेन शेख, जमील अहमद शेख, मोहम्मद अफसर, वाजिद अली सय्यद हे उपस्थित होते.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !