घुग्गुस भाजपतर्फे भुट्टोचा पुतळा जाळून निषेध!
चंद्रपूर, दि. १७ डिसेंबर.
पाकिस्तानचे वाचाळवीर परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो याने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC)च्या सभेत काश्मीरबाबत जुनाच राग आळवत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचेवर तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भारताबद्दल आक्षेपार्ह विधान केले. भुट्टोचे हे विधान म्हणजे तर्कहिन आणि लज्जास्पद असून त्याने तात्काळ माफी मागावी असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केला.
घुग्घुस येथील गांधी चौकात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या निदर्शन आंदोलनात ते बोलत होते.
याठिकाणी भाजपतर्फे पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टोचा प्रतिकात्मक पुतळा जाळून तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. भुट्टो व पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत नारेबाजी करण्यात आली.
पुढे बोलताना जिल्हाध्यक्ष भोंगळे म्हणाले, की जो देश दहशतवादाची जन्म अन् कर्मभूमी आहे. ज्या देशाला सदानकदा राजकीय, सामाजिक, आणि आर्थिक भानगडीने सुरूंग लागला असतो. त्या देशाच्या परराष्ट्रमंत्र्याने भारतावर आणि विश्वगौरव असलेल्या मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचेवर खालच्या पातळीवर जाऊन बोलणे म्हणजे निव्वळ तर्कहिन आणि लज्जास्पद आहे. ज्यांनी लादेनला आश्रय दिला, भारताच्या संसदेवर हल्ला केला, त्यांना शांततेवर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. खरेतर पाक पुरस्कृत दहशतवादावर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घेतलेल्या सडेतोड भुमिकेमुळे या पाकिस्तानी पिलावळांची पायाखालची वाळू सरकली आणि त्यातूनच हे असे तर्कहीन विधान हे लोक करत असतात. असा घणाघात करून त्यांनी भुट्टोसह पाकिस्तानचे वाभाडे काढले.
या निदर्शनावेळी, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजयुमोचे प्रदेश सचिव अनिल डोंगरे, संजय तिवारी, निरीक्षण तांड्रा, विनोद चौधरी हसन शेख, सिनू इसारप, साजन गोहणे, अमोल थेरे, प्रविण सोदारी, बबलू सातपुते, शाम आगदारी, हेमंत पाझारे, निरंजन डंभारे, राजेश मोरपाका, मानस सिंह, रत्नेश सिंह, मनिष यादव, ऋषी कोवे, गोलू यादव, रमेश यादव, श्रीधरबुडी खंडेला, प्रमोद सिद्दम, सुशील डांगे, विजय पचारे, आकाश लोहकरे, रोहन मांढरे, सोहेल शेख, अमन पाटील, शशी बोंगोणी, कृष्णा शाह, संजय पंडित, विशाल बेदी, संतोष गुप्ता, विजय माथनकर, प्रविण बनपूनकर, विशाल दुर्गे, दिपक सिंह, आनंद चौधरी, नितीन भोंगळे, राकेश जोदा अजगर खान, स्वप्निल झाडे, नंदु करमनकर, सुरेंद्र झाडे, नितीन काळे, राहुल मांढरे, प्रतिक पिंपळकर, मुकेश विधाते, महेंद्र जेनेकर, गणेश बोबडे, रोशन जयस्वाल, बंटी बघेल, शाम आरकिल्ला, नरेंद्र परचाके, विजय ठेपाले, पियुष भोंगळे, प्रज्वल कपारे, मुस्तफा शेख, श्रीकांत सावे, हरी क्षिरसागर, सुनील राम, गणेश खुटेमाटे, मयुर डाखरे, गणेश तुराणकर, कोमल ठाकरे, शरद गेडाम, रुपेश आसमपेल्लीवार, अभिलेश, मनमोहन महाकाली, प्रवेश सोदारी, सुरेश बोधेकार, अनील तूराडे, राजेश ऐटावार समय्या कटकम, गोविंद प्रजापति, बागेश्वर रामटेके, विक्की सारसर, अभिजित व्यास, बाळू शर्मा, रवी बेदगुलवार, उदय तांड्रा, प्रेम बंसारी, वेद गिरी, दिलीप लेनगुरे, दिपक यादव, सुधाकर भेदोडकर, प्रकाश पाचभाई, रवि घोडके, मनमोहन माहुर्ले, रवि गोरे, शाम ऐटापेल्ली, नरेश सदाफळे रोहित गोरे, अनिल नित, निलेश भोंगळे, विष्णू वरचे, काशी यादव, मंगेश राजगडकर, आशु गुप्ता, दिलीप कांबळे, गजानन चिंचोलकर, दत्तू राऊत, सुनिता पाटील,भावना दुबे ,योगिता सोनटक्के,अमिना बेगम,चंद्रपाल बहुराशी, राकेश चिंताला, अजय आमटे, अजय साहु, मेघराज लांजेवार आदींसह मोठ्या संख्येने स्थानिकांची उपस्थिती होती.