ट्रकच्या धडकेत मायलेकी ठार!

0

⛔ Accident Breaking!

▪️मौदा येथील रबडीवाला टी-पॉईंट जवळील घटना.

▪️चिमुकलीचे नाव ठेवण्यापूर्वीच चिमुकलीवर काळाची झडप!


नागपुर, ०२ डिसेंबर २०२२.
भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्ग ०६ वरील मौदा येथील रबडीवाला टी-पॉईंट जवळ काल ( गुरुवार दि. 1 डिसेंबर) रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास ट्रकने दुचाकीस्वारास धडक दिली. यामध्ये पत्नीसह तिच्या तीन महिन्याच्या चिमुकलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

कुही तालुक्यातील चिकना डोंगर मौदा येथील दुचाकीस्वार राजहंस किसन वाघमारे (२८), मृत पत्नी प्रांजल वाघमारे ( वय २२) तीन महिन्यांची चिमुकली व आई अंजना किसन वाघमारे ( वय ४५) हे MH 40 /CE 2926 RTO क्रमांकाच्या दुचाकीने चिकना डोंगर मौदा येथून मौदा येथील परमात्मा एक आश्रम येथे येत असताना रबडीवाला टी -पॉईंट वरून रस्ता ओलांडतांना भंडाराकडून भरधाव येणाऱ्या ट्रकने धडक देताच प्रांजल राजहंस वाघमारे सह तिच्या चिमुकलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर राजहंस व त्यांची आई अंजना वाघमारे दोघेही जखमी आहेत. सदरहू घटनेची माहिती मिळताच मौदा पोलीस स्टेशनचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांचेसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चिमुकलीचा मृतदेह स्वतः उचलून दोन्ही मृतकाचे शव मेयो हॉस्पिटल मध्ये शवविछेदना करिता पाठवले. तर ट्रक चालकाला पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
सदरहू घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांचा मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक जगदीश बिरोले हे करीत आहेत.Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !