Mahatma fule : गुंजेवाहीत महात्मा फुले पुण्यतिथी महोत्सव तथा समाज प्रबोधन मेळावा

0


SINDEWAHI । 27 NOVEMBER 2023
तालुक्यातील गुंजेवाही येथे क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma fule) यांच्या पुण्यतिथीनिमित्त उद्या (दि. २८) माळी समाजाच्या वतीने पुण्यतिथी महोत्सव तथा समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माजी पं. स. उपसभापती विरेंद्रकिशोर जयस्वाल यांचे हस्ते संपन्न होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रम्हपुरी पं.स. माजी सभापती वंदना शेंडे उपस्थित राहणार आहेत. तर सहउद्घाटक म्हणून माजी पं. स. सदस्य राहूल पोरेड्डीवार हे ही यावेळी उपस्थित असतिल.
समाज प्रबोधन मेळाव्यात डॉ. प्रेमकुमार खोब्रागडे, विनोद कोवे, गूरूदास शेंडे, बंडू गायकवाड आणि किरण बोरूले यांचे मार्गदर्शन होणार आहे.
या कार्यक्रमाला गुंजेवाही परीसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे अशी विनंती आयोजक माळी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !