SINDEWAHI : अंगावर वीज पडून एक ठार एक जखमी

0


SINDEWAHI । 20 SEPTEMBER 2023
शेतात काम करीत असलेल्या दोन महिलांच्या अंगावर वीज पडल्याने ६४ वर्षीय महानंदा मोतीराम अलोणे हिचा जागीच मृत्यू तर रोषणा प्रफुल्ल गेडाम (३९) ही जखमी झाल्याची दुर्दैवी घटना सिंदेवाही तालुक्यातील सिरकाडा येथे घडली.


स्थानिक शेतकरी प्रदीप यादव बोरकर यांच्या शेतामधून निंदन काढून घराकडे निघत असतांना दुपारी एक वाजताच्या दरम्यान शेतामध्येच वीज पडून महानंदा मोतीराम अलोणे यांच्या जागीच मृत्यू झाला तर रोषणा प्रफुल्ल गेडाम ह्या जखमी झाल्या आहेत.
सद्या ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे रोशना गेडाम यांच्यावर उपचार सुरू असून पुढील तपास पोलीस स्टेशन सिंदेवाही करीत आहे.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !