Ahilyadevi holkar : श्यामलता डांगे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पूरस्काराने सन्मानित!

0


SINDEWAHI । 2 JUNE 2023
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रांतील सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन सेवा देणाऱ्या महीलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Ahilyadevi holkar) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सिंदेवाही तालुक्यातील मौजा खातगाव येथील श्यामलता विनायक डांगे यांनाही स्थानिक ग्रामपंचायतीच्या वतीने सदर पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले.


खातगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या श्यामलता विनायक डांगे ह्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान पंचायत समिती कक्ष सिंदेवाही अंतर्गत संविधान महीला ग्रामसंघ मध्ये २०१७ पासून खातगाव येथे आय. सि. आर. पी. म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वात २१ गट कार्यरत असुन २२५ ते २५० महीलांचा समुह त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. सामाजिक कार्यासह शासनस्तरावरून येणाऱ्या योजना ग्रामीण महिलांना व्यवस्थित समजावून सांगणे व त्यांचा सक्रिय सहभाग वाढवून घेणे या माध्यमातून महीलांचे समुपदेशन, सक्षमीकरण करण्याचे काम त्या गेल्या कित्येक वर्षांपासून कसोशीने करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन
ग्रामपंचायत कार्यालय खातगाव यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रशस्तीपञ, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व धनादेश देऊन त्याच्या सन्मान केला.
यावेळी सरपंच मेघश्याम शिडाम, उपसरपंच निखिल पोहणकर, ग्रामसेवक मानकर, तंमुस अध्यक्ष तथा ग्रा.पं. सदस्य तेजेंद्र नागदेवते, सुरेखा नैताम, पो. पा. वंदना वरखडवार यांनी सदर पुरस्काराचे वितरण केले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !