विद्यार्थीनींच्या हाती “जिल्हा परिषदेचा” कारभार! #ZPchandrapur

0


सीईओ जाॅनसन यांच्या संकल्पनेतून असाही महिला दिन..

CHANDRAPUR । 08 March 2023
जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेमध्ये अभिनव पध्दतीने आज महिला दिन साजरा करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार्‍या निवडक १८ विद्यार्थीनींना अधिकाऱ्यांनी स्वत:च्या खुर्चीवर बसवून कामकाज सांभाळण्यास सांगितले. विशेष म्हणजे या विद्यार्थीनींनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत एक दिवसाकरीता अधिकारी बनून मिनी मंत्रालयाचा (zilla parishad chandrapur) कारभार सांभाळला.
जिल्हा परिषदेचे शासन स्तरावरील कामकाज कसे चालते, या बाबींची ओळख करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार्‍या मुलींना आज अधिकाऱ्यांचा मान देण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या खुर्चीसह सर्व विभाग प्रमुखांच्या खुर्चीवर बसून विद्यार्थीनींनी आज कामकाज सांभाळले.


यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून वंशिका वेट्टी (जि.प.उ. प्रा. शाळा, खुटाळा ता. चंद्रपूर), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुचिका सातरे (जि.प.उ. प्रा. शाळा, देवाडा खुर्द ता. पोंभुर्णा), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी म्हणून जागृती कुडे (जि.प.उ. प्रा. शाळा, मारडा ता. चंद्रपूर), मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी म्हणून दिव्या केंद्रे (जि.प.उ. प्रा. शाळा, पालडोह ता. जिवती), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) तक्षशीला घागरगुंडे (जि.प.उ. प्रा. शाळा, दाताळा ता. चंद्रपूर), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व.) श्रृती भालेराव (जि.प.उ. प्रा. शाळा, कुंभेझरी ता. जिवती), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.व बा.) तन्वी काकडे (जि.प.उ. प्रा. शाळा, नांदगाव पोडे ता. बल्लारपूर), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) श्रध्दा कस्तुरे (जि.प.उ. प्रा. शाळा, दाबगाव ता. मुल), जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून राधिका आत्राम (जि.प.उ. प्रा. शाळा, यशवंत नगर, ता. चंद्रपूर), कार्यकारी अभियंता (बांधकाम) अक्षरा गायकवाड (जि.प.उ. प्रा. शाळा, चिंचाळा ता. चंद्रपूर), कार्यकारी अभियंता (जलसंधारण) विशाखा देवकाते (जि.प.उ. प्रा. शाळा, पालडोह ता. जिवती), कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु) प्रिती जवाले (जि.प.उ. प्रा. शाळा, कुंभेझरी ता. जिवती), जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी वेदिका गेडाम (जि.प.उ. प्रा. शाळा, दाताळा ता. चंद्रपूर), उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक (मनरेगा) तन्वी काकडे (जि.प.उ. प्रा. शाळा, नांदगाव पोडे ता. बल्लारपूर), जिल्हा समाजकल्याण अधिकारी कशीश कासवटे (जि.प.उ. प्रा. शाळा, यशवंत नगर ता. चंद्रपूर), कृषी विकास अधिकारी इच्छा वाळके (जि.प.उ. प्रा. शाळा, खुटाळा ता. चंद्रपूर), शिक्षणाधिकारी (प्राथ.) आर्या बुरांडे (जि.प.उ. प्रा. शाळा, दाबगाव ता. मूल) आणि शिक्षणाधिकारी (माध्य.) म्हणून कृतिका बुरांडे (जि.प.उ. प्रा. शाळा, देवाडा खुर्द ता. पोंभुर्णा) या विद्यार्थीनींनी जिल्हा परिषदेचा आजचा एकदिवसीय कार्यभार सांभाळला.


जिल्ह्याच्या मिनी मंत्रालयाचा गाडा हाकत असलेल्या विवेक जाॅनसन (IAS) या नव्या सीईओंच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !