चांदा न्यूजचे मुख्य संपादक अरूण मादेशवार वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज “महाराष्ट्र रत्न” पुरस्काराने सन्मानित!

0

♻️ माहीती अधिकार, पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेना व इंडीया 24 न्यूज यांच्या वतीने चंद्रपूरात राज्यस्तरीय सन्मान सोहळा...

CHANDRAPUR। 06 March 2023
माहीती अधिकार, पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेना व इंडीया 24 न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने चांदा न्यूजचे मुख्य संपादक तथा सोसायटी फॉर फास्ट जस्टिस विदर्भ चे जिल्हाध्यक्ष अरूण मादेशवार यांना वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज “महाराष्ट्र रत्न” पुरस्काराने काल (दि. ०५ मार्च) सन्मानित करण्यात आले.माहीती अधिकार, पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण सेना व इंडीया 24 न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूरातील कर्मविर दादासाहेब मा. सा. कन्नमवार सभागृहात आयोजित केलेल्या वर्धापन दिन तथा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अविनाश सकुंडे, पोलीस मित्र संगटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कैलास पठारे, इंडिया 24 न्यूजचे मुख्य संपादक तथा माहिती अधिकारचे प्रदेशाध्यक्ष तुळशीराम जांभुळकर, राज्य महिला अध्यक्षा सौ. शिल्पाताई बनपुरकर, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे केंद्रीय सचिव राजेंद्र देशमुख यांनी सन्मानपत्र व शील्ड देऊन त्यांचा गौरव केला.अरूण मादेशवार हे निर्भीड व निष्पक्ष लेखणीच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दीर्घकाळापासून देत असलेल्या योगदानाबद्दल तसेच सामाजिक क्षेत्रात करत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

श्री. मादेशवार यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त होताच त्यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !