सिंदेवाही बसस्थानकातील मुत्रीघराच्या सांडपाण्याची व्यवस्था करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा #Sindewahi

0

नपं. सभापती भाष्कर नन्नावार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाचे वाहतूक नियंत्रकांना निवेदन..


SINDEWAHI । 11 Feb 2023
सिंदेवाही शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकातील मुत्रीघरातील सांडपाण्याचे (मलमुत्र) योग्यरीतीने निचरा होत नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे प्रवाशांसह परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो आहे.
यावर लवकरात लवकर उपाययोजना करून मुत्रीघरातून निघणाऱ्या सांडपाण्याचा योग्यरीतीने निचरा करण्यासाठी बस स्थानक प्रशासनाने तातडीने पाऊल उचलावी अशी मागणी सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीचे बांधकाम व नियोजन समिती सभापती भाष्कर नन्नावार यांनी निवेदनातून केली आहे.


सभापती नन्नावार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाचे वाहतूक नियंत्रकांना आज निवेदन देऊन या गंभीर समस्येबाबत चर्चा केली.
या शिष्टमंडळात उपनगराध्यक्ष मयुर सुचक, मिलिंद चिमुरकर, नंदकिशोर डोर्लिकर आदींची उपस्थिती होती.या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना न केल्यास ब्रम्हपुरी-सिंदेवाही वाहतूक ठप्प करून आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ही यावेळी नन्नावार यांनी दिला.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !