वृद्धाची गळफास लावून आत्महत्या !

0


गुडघेदुखीच्या असह्य वेदना आणि कर्जाची चिंता ठरली कारणीभूत...

नागभिड, दि. १४ जानेवारी २०२३.
तालुक्यातील बाम्हणी येथे शुक्रवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास वृद्धाने गळफास लावून आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.बाबुराव तुकाराम गजभे (६५) रा बाम्हणी ता. नागभिड जि. चंद्रपूर असे मृतकाचे नाव असून बाबुराव हे मागील एक वर्षापासुन गुडघेदुखीच्या त्रासाने ग्रस्त होते. वृद्धापकाळाने दिवसेंदिवस होणार्‍या असह्य वेदना आणि सततच्या नापिकीमुळे बॅंकेच्या कर्जाची कशी परतफेड करावी? या चिंतेतून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट होत आहे.
काल (दि. १३) रात्रीच्या सुमारास घरी कोणी नसताना शौचालयाजवळील आळ्याला नायलॉनच्या दोराने फाशी घेत त्यांनी स्वतःच आयुष्य संपविलं.अशी तोंडी रिपोर्ट फिर्यादीकडून पोलीस स्टेशन नागभीड येथे दाखल करण्यात आली आहे. सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार श्री. वारजुरकर हे करीत आहेत.

#Suicide #Nagbhir #Chandrapur 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !