पत्रकार दिनाच्या औचित्याने पत्रकार आरोग्य विम्याचेही शुभारंभ...
चंद्रपूर, दि. ०८ जानेवारी.
व्हाईस ऑफ मीडिया चंद्रपूर च्या वतीने स्थानिक हॉटेल सिद्धार्थ येथील सभागृहात पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याचवेळी पत्रकारांना देण्यात येत असलेल्या आरोग्य विम्याचे ही याठिकाणी शुभारंभ करण्यात आले.
या कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार सुनिल कुहिकर, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, मंगेश खाटिक, आनंद आंबेकर, संजय पडोळे, सारंग पांडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या कार्यक्रमादरम्यान सत्कारमूर्ती म्हणून बल्लारपूर येथील ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर, सावली येथील वसंत डोहणे, प्रेस क्लब चंद्रपूरचे अध्यक्ष संजय तायडे, आणि नागपूर येथील जेष्ठ पत्रकार गोपालकृष्ण मांडवकर यांचा सन्मान ही करण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रमात पत्रकारांची कालची आणि आजची स्थिती, त्यांचे सामाजिक व कौटुंबिक जीवन, कर्तव्य तसेच हक्क यासोबतच पत्रकारांसाठी आरोग्य सुविधा म्हणून विमा कवच, घराची सोय, तालुका स्तरावर पत्रकार भवन, मुलांचे शिक्षण, अधिस्वीकृती कार्ड, शासकीय योजना याविषयी विविध मान्यवरांनी विस्तृत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातून मोठ्या संख्येने विविध माध्यमांतील पत्रकार बंधू - भगिनी उपस्थित होत्या.