♻️ शिक्षण संस्थांचा उद्देश हा राष्ट्रोद्धारार्थ विद्यार्थी घडविण्याचा असावा! - जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

0


कै. निलकंठराव गुंडावार जयंती समारोह व लोकमान्य शाळेच्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन संपन्न.


भद्रावती, दि. २० जानेवारी २०२३
येथील लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या लोकसेवा संस्थेचे आद्य संस्थापक कै. निलकंठराव गुंडावार यांच्या जयंतीनिमित्त आजपासून सुरू होत असलेल्या जयंती समारोह तसेच शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष तथा जि. प. चे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या शुभहस्ते पार पडले. 


याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले की, ७१ वर्षांपुर्वी भद्रावती नगरातून शैक्षणिक क्रांतीची सुरवात करणाऱ्या कै. निलकंठराव गुंडावार यांनी या भागातील गोरगरिब, होतकरू विद्यार्थ्यांना बालवयापासूनच संस्कारक्षम ज्ञानार्जन उपलब्ध व्हावे याकरिता लोकसेवा शिक्षण मंडळाची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून आज शेकडो विद्यार्थी ज्ञान अर्जित करीत आहेत. अनेक माजी विद्यार्थी चांगल्या प्रकारे नौकरीत, व्यवसायात असून संस्कारक्षम जिवनप्रपंच करताहेत. हे पाहून आनंद होतो. बालवयापासूनच राष्ट्रभक्ती व राष्ट्रसेवेचे शिक्षण आपल्या संस्थेच्या माध्यमातून दिल्या जाते. हे निश्चितच प्रेरणादायी कार्य आहे. 
पुढे बोलताना, खरेतर, शिक्षणसंस्थानी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी सदैव कटिबद्ध रहायले पाहीजे. आणि त्‍यामाध्‍यमातुनच विद्यार्थ्यांंना नाविन्यपूर्ण कौशल्यात्मक ज्ञान देत त्यांच्या सृजनशीलतेला चालना देण्याचे काम शाळेच्या शिक्षकांकडूनही झाले पाहिजे. आज शैक्षणिक क्षेत्रातील स्पर्धा बघता, चांगल्या शिक्षणसंस्थाना अधिक महत्त्व आहे. प्रत्येक पालक आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी झटत असतो. आजचा सुसंस्कारी बालक हा उद्याचा नागरिक असतो. त्यामुळे शिक्षण संस्थांनी राष्ट्रोद्धारार्थ विद्यार्थी घडविण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच कार्य करावे. असे प्रतिपादन याठिकाणी उद्घाटनीय मनोगतातून त्यांनी व्यक्त केले. 


याप्रसंगी, संस्थेचे सर्वेसर्वा चंदूभाऊ गुंडावार, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, मनोहर पारधे, नामदेव कोल्हे, उमाकांत गुंडावार, गोपाल ठेंगणे, सहसचिव अमित गुंडावार, प्राचार्या श्रीमती सोनटक्के, सरपटवार सर, रूपचंद धारणे आदींसह शाळेचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !