सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांकडून काम वाटपासाठी अर्ज आमंत्रित...

0
चंद्रपूर, दि. ०५ डिसेंबर २०२२.
जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना काम देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्हास्तरीय कामवाटप समिती नियुक्त करण्यात आली आहे. 
या समितीच्या वतीने कार्यालयात नोंदणी असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांच्या  सेवा  सहकारी संस्थांना कौशल्य विकास विभाग चंद्रपूर येथे एक शिपाई तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग चिमूर येथे तीन अकुशल कामगार  असे कामाचे वाटप करण्यात येणार आहे.

वरील कामवाटपासाठी  सुशिक्षित बेरोजगारांच्या  सेवा  सहकारी  संस्थांनी कौशल्य विकास कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधून कामाबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्यावी व १६ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज सादर करावे. अर्जासोबत संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, बँकेची पासबुक छायाप्रत, लेखापरीक्षण अहवालाची प्रत, संस्थेचे पॅन कार्डची प्रत, सभासदांचे चालू असलेले  सेवायोजन कार्ड,  सभासद क्रियाशील असल्याचे प्रमाणपत्र जोडावे. सेवा सहकारी संस्था कार्यरत असावी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे परवान असेल तर प्राधान्य देण्यात येईल असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्यासाहेब येरमे यांनी केले आहे.Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !