सोमवारी जे. पी. नड्डा चंद्रपूरात!

0

· लोकसभा प्रवास योजनेंतर्गत न्यू इंग्लिश शाळेच्या पटांगणात भाजपाची जाहीर सभा..


📢उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशअध्यक्ष बावनकुळे, पालकमंत्री मुनगंटीवार देखील असणार उपस्थित!


चंद्रपूर, दि. ३० डिसेंबर. 
देशातील एकूण लोकसभा क्षेत्रापैकी १४४ लोकसभा क्षेत्र हे भाजपकडे नाहीत. अशा लोकसभेत २०२४ मध्ये कमळ फुलविण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने लोकसभा प्रवास योजना कार्यक्रमाची आखणी केली आहे. याच पाश्र्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे सोमवारी दि. ०२ जानेवारी रोजी चंद्रपूरात जाहीर सभेसाठी येत असून यादरम्यान ते चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या संगटनात्मक रचनेचा तसेच राजकीय, सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करतील. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे चंद्रपूरपासून सुरवात करून महाराष्ट्रातील अन्य लोकसभा क्षेत्राचा दौरा करतील. दि. ०२ जानेवारी रोजी शहरातील न्यु इंग्लिश हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित सभेला नड्डा संबोधित करणार आहेत. 
चंद्रपूरात आगमन होताच नड्डा हे शहराच्या आराध्य दैवत माता महाकालीचे दर्शन घेऊन पुढे सभास्थळी पोहोचणार आहेत.
या सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर हे देखील मंचावर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. 
यासोबतच यापुढील प्रवासात देशाचे गृहमंत्री अमित शहा, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही चंद्रपूर दौरा होईल, अशी शक्यता त्यांनी यावेळी वर्तविली. 
याप्रसंगी, महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, माजी आमदार संजय धोटे व वरोराचे माजी नगराध्यक्ष अहेतेश्याम अली उपस्थित होते. 

याचवर्षी सप्टेंबर महिन्यात लोकसभा प्रवास योजनेंतर्गत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिप सिंह पुरी चंद्रपुरात येऊन गेले होते. 

 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !