BIG BREAKING! अखेर महायुतीचं ठरलं, भाजप ३१ तर शिवसेना आणि अजितदादा गट इतक्या जागांवर लढणार!

0
MUMBAI : 12 MARCH 2024
भाजपच्या केंद्रीय निवडणुक समितीच्या बैठकीत सोमवारी रात्री महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघाची सखोल चर्चा झाली. या सर्व मतदारसंघात महायुतीचे कोण उमेदवार निवडून येऊ शकतात यावर सविस्तर चर्चा झाली.
या चर्चेत महायुतीमधील प्रमुख पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना कोणते मतदारसंघ सोडायचे आणि त्यांचे उमेदवार देखील कोण असावेत यावरही या बैठकीत चर्चा झाली.


बैठकीत भाजप सर्वाधिक ३१ लोकसभा मतदार संघात लढण्यावर निर्णय झाल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. तर शिवसेना पक्षाला १३ लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करता येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यातील ४ लोकसभा मतदारसंघात त्यांचे उमेदवार उभे करता येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या उमेदवारांची आणि मतदारसंघाची यादी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वांच्या बैठकीत मांडली होती. त्याच बरोबर त्यांच्या सोबत आलेल्या खासदारांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचा मान राखत त्यांना त्यांच्या १३ लोकसभा मतदारसंघातील जागा देण्याचा शब्द दिला.

भाजपने शिवसेनेला राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघ देताना त्यात एका जागेचा बदल केला आहे तर एका मतदारसंघात उमेदवाराचा बदल केला आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघ भाजपने घेतला आहे. तर त्या बदल्यात शिवसेनेला ठाणे लोकसभा मतदारसंघ दिला आहे. तसेच कोल्हापूर लोकसभा मंतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या ऐवजी समरजीत घाटगे हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवतील. दूसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला राज्यातील ४ लोकसभा मतदारसंघ देण्यात येणार आहे.

बारामती, शिरूर, रायगड आणि परभणी हे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येणार आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे गजानन किर्तीकर आणि कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांचे विधान परिषदेवर राजकीय पुर्नवसन करण्यात येणार आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघातील प्रत्येक उमेदवारावर काल भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत चर्चा झालीय. आता तीनही पक्षांचे जागावाटप येत्या दोन दिवसांत जाहीर होणार असल्याचीही माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !