SINDEWAHI : गौण खनिजाची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त!

0

सिंदेवाही तहसील कार्यालयाची मोठी कारवाही.. 
SINDEWAHI। 17 NOVEMBER 2023
तालुक्यात सर्रासपणे गौण खनिजांचे अवैध उत्खनन करुन शहरात वाहतूक करणारे MH 34 BF 3454 या क्रमांकाचे ट्रॅक्टर जप्त करून सिंदेवाही तहसील कार्यालय येथे लावण्यात आले आहे. 
या कारवाईमुळे अवैधरीत्या गौण खनिजांची तस्करी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.


                  सिंदेवाही तालुका हा गौण खनिजांसाठी प्रसिद्ध असून येथे अनेक तस्कर महसूल व वनविभागाला हुलकावणी देऊन गौण खनिजाची तस्करी करत असतात. या तालुक्याला मागील सहा महिन्यात सहा तहसीलदार लाभले परंतू कोणत्याही अधिकाऱ्यास गौण खनिज चोरीवर आळा घालण्यात फारसे यश आले नाही. 
दरम्यान बुधवारी दुपारी ४ वाजता अवैध्य मुरूमाचा ट्रॅक्टर नवरगाव रोड कडून येत असल्याचे माहिती महसूल विभागाला मिळताच सिंदेवाहीचे नायब तहसीलदार मंगेश तुमराम यांनी शहरातील शिवाजी चौक येथे सदर ट्रॅक्टर थांबवून ट्रॅक्टरची चौकशी केली असता ट्रॅक्टर मध्ये मुरूम असल्याचे निदर्शनास आले. सदर वाहनाचे क्रमांक -MH 34 BF 3454 असून मुरूम वाहतूक करणारी ट्राली विना क्रमांकाची आहे. तसेच वाहन चालकाकडे गौण खनिज वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे वरील क्रमांकाचे ट्रॅक्टर तहसील कार्यालय येथे आणून जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. सिंदेवाहीचे तहसीलदार संदीप पानमंद यांचा मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार मंगेश तुमराम यांनी केली आहे. या कारवाईने सिंदेवाही तालुक्यातील अवैध गौणखनिज उत्खनन करून तस्करी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर ट्रॅक्टर मालकाचे नाव वृत्त लिहेपर्यंत कळू शकले नसले तरी, शहरातील एका बड्या राजकीय पुढाऱ्याचे ते ट्रॅक्टर असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !