GADCHIROLI : शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करा!

0


सोसायटी फॉर फास्ट जस्टीस (विदर्भ ) यांची कारवाईची मागणी.

GDCHIROLI । 11 OCTOBER 2023
राज्यात 2010 पासून नोकरभरती बंद असतानाही काही जिल्ह्यामध्ये मंत्रालय स्तरीय अधिकाऱ्यांच्या बनावट पत्राच्या आधारे नियमबाह्य पद्धतीने शिक्षक भरती करण्यात आली. या प्रकरणाचे धागेदोरे गडचिरोली जिल्ह्यापर्यंत असल्याने जिल्ह्यातील शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करून चौकशी अंती संबंधित अधिकाऱ्यांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सोसायटी फॉर फास्ट जस्टीस (विदर्भ )यांनी शासनाला दिलेल्या तक्रार अर्जात केली आहे.


               सन 2010पासून राज्यात शिक्षक भरती बंद आहे. त्यावेळी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन झाल्याशिवाय खाजगी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये नवीन शिक्षक वा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करता येणार नाही. असा निर्णय शासनाने घेतला होता. परंतु काही जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांनी मंत्रालयातील एका अधिकाऱ्याला हाताशी धरून नियमबाह्य पद्धतीने गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील नूतन शिक्षण प्रसारक मंडळ या या संस्थेचे सचिव मोतीलाल कुकरेजा यांनी सन 2017-18 मध्ये 6 शिक्षकांची बेकायदेशीर रित्या नियुक्ती करून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करून बनावट पत्राच्या आधारे खाजगी शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.


 मंत्रालयातून परवानगी घेतली. पण कोणतीही जाहिरात दिली नाही. रीतसर मुलाखती घेतल्या नाही. रोस्टर नुसार पद भरती न करता त्या सहा शिक्षकांची नियुक्ती सन 2017-18 पासून दाखविण्यात आली.या शिक्षकांचा पगार बोगस कागदपत्राच्या आधारे शालेय आय डी मधून पगार देणे सुरु आहे. सदर संस्थेतील सहा नियुक्त शिक्षकांपैकी काही शिक्षक सन 2018-19 सत्रापर्यंत दुसऱ्या खाजगी शाळेत शिकवीत होते. त्यांचे त्या खाजगी शाळेत दैनंदिनी रजिस्टर वर सह्या आहेत. या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन शाळेची मान्यता रद्द करून कारवाई करावी. तसेच बोगस नियुक्त्या देणारे आणि सुशिक्षित बेरोजगाराकडून लाखो रुपयांना गंडविणाऱ्या माध्यमिक शिक्षणाधिकारी, गडचिरोली, विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर यांनी (1) दिनांक 27-08-2018 या अवर सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे पत्र क्रं. संकीर्ण -2018/( सं. क्रं 137) टी एन टी -1 (2) दिनांक 4 एप्रिल 2018या शा. नि. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रं एस एस एन -2018/( प्र. क्रं.94/18/ टी एन टी -2 पत्राचे संदर्भ टाकून पत्रव्यवहार करून शासनाची फसवणूक केल्यामुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. ज्या जिल्ह्यात शिक्षक भरत्या करण्यात आल्या आहेत. त्या भरती घोटाळ्याची गंभिर पणे समितीच्या माध्यमातून चौकशी चे आदेश प्रस्थापित करून दोषी संस्थापक व संबंधित शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यावर अटी शर्थीचा उल्लंघन करून कर्तव्यात कसूर केल्याने निलबंनाची कारवाई करून फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सोसायटी फॉर फास्ट जस्टीस (विदर्भ ) यांनी शासनाला दिलेल्या पत्रात केली आहे.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !