RBI : आता 500 रुपयाच्या नोटाही बंद होणार?

0

काय म्हणाले गव्हर्नर.. वाचा सविस्तर :-
CHANDRAPUR । 09 JUNE 2023 
१००० रुपयाच्या चलनी नोटांबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नवी माहिती दिली आहे. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेत चलनात असलेल्या ५०० रुपयांच्या नोटा काढून टाकणे किंवा बंद करणे अशा कोणत्याही विचारात आरबीआय नसल्याचे स्पष्टीकरण गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी दिले आहे. 
यासोबतच १००० रुपयाच्या जूण्या नोटा पुन्हा चलनात आणण्याचा बातम्यांमधे कोणतेही तथ्थ नसून त्यासंदर्भातील अफवांवर जनतेनी विश्वास ठेवू नये. असे आवाहन ही त्यांनी देशवासियांना केले आहे.


५०० रुपयांच्या नोटा बंद होणार? 
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) २००० रुपयाच्या चलनी नोटा (2000 Notes Withdraw) नोटा चलनातून बाद केल्या आहेत. येत्या ३० सप्टेंबरपर्यंत या २००० च्या नोटा नागरिकांनी बँकेत जमा करावे, असे आदेशही आरबीआयने दिले. त्यानंतर ५०० रुपयांच्या नोटाही चलनातून बाद होणार असल्याच्या चर्चांना पेव फुटला. तसेच १००० रुपयाच्या बंद झालेल्या नोटा पुन्हा बाजारात येणार असल्याचेही अफवा चांगलीच पसरली होती. त्यामुळे यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. 
काय म्हणाले गव्हर्नर? 
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्टिकरण दिले आहे की, ५०० रुपयांच्या चलनी नोटा काढून टाकण्याचा किंवा १००० रुपयाची नोट पुन्हा चलनात आणण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहनही त्यांनी केले आहे. तसेच २००० रुपयाच्या नोटांबद्दल बोलतांना, चलनात असलेल्या २००० रुपयांच्या ५०% टक्के म्हणजे ०१ कोटी ८२ लाख रुपयांच्या नोटा परत आल्याचेही त्यांनी सांगितले. 

२००० रुपयाच्या एकूण ०३.६२ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. नोटा चलानतून बाद करण्याची घोषणा केल्यानंतर २००० रुपयाच्या सुमारे ०१.८ लाख कोटी रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत. हा आकडा चलनात असलेल्या २००० रुपयाच्या नोटांपैकी अंदाजे ५०% टक्के आहे. असेही ते म्हणाले आहेत.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !