Maargeen : मार्गीनकडून विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण!

0

चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना होणार फायदा!

SINDEWAHI । 18 JUNE 2023
ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कौशल्याधारीत रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाचे विकास व्हावे या उद्देशाने मार्गीन (Maargeen) कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड या मूळच्या ठाणे (thane, maharastra) येथील संस्थेकडून चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध कौशल्यात्मक अभ्यासक्रमाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना अकाउंटिंग व टॅक्सेशन, टॅली, डिजिटल मार्केटिंग, बेसिक्स ऑफ हॉस्पिटॅलिटी, बेसिक्स इंग्लिश, इन्कम टॅक्स या अभ्यासक्रमाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या आठवड्यात मार्गीनची एक टीम चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतील काही तालुका आणि ग्रामीण क्षेत्रातील पदवी महाविद्यालयांना भेट देण्यासाठी येणार असून या भेटीत या क्षेत्रातील महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना योग्य शैक्षणिक व कौशल्याधारीत प्रशिक्षण कसे देता येईल हे जाणून घेण्याचा प्रयत्न ही टीम करणार आहे. त्यामुळे याचा चांगला फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे.


मार्गीनच्या या उपक्रमाचा फायदा चंद्रपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा. असे आवाहन मार्गीन कडून करण्यात येत आहे. यासोबतच संस्थेच्या व प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी www.maargeen.com या अधिकृत संकेतस्थळावर किंवा 8655930842 या क्रमांकावर विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचे मार्गीन कडून कळविण्यात आले आहे.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !