DCM : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी चंद्रपूरात!

0

Modi@9 अभियानाच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभेचे आयोजन.
CHANDRAPUR । 21 JUNE 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारच्या नऊ वर्षाच्या विकासात्मक कारकिर्दीची माहिती देण्यासाठी रविवार, २५ जून २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे चंद्रपूरातील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या सभेत जनतेशी संवाद साधणार आहेत.


या सभेसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, जिल्ह्यातील सर्व माजी आमदार तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या जाहीर सभेकरीता नागरिकांनी व भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले आहे.


Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !