उबाठा ला दणका, शिवसेना शिंदेंचीच! #Shivsena

0

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ! 

धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडेचं.. 


MUMBAI । 17 Feb 2023
देशातील राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेनेचे नाव (Shivsena) आणि धनुष्यबाण चिन्ह दोन्ही मिळाले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज हा निर्णय दिला असून आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.


दरम्यान, या निकालानंतर उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात मातोश्रीवरून थेट LIVE येणार आहेत. आता ठाकरे गटाची पुढील रणनीती काय असेल हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. 


बहुमताच्या आधारावर निवडणूक आयोगाचा निर्णय! 

साधारणतः आठ महिन्यांपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला होता. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंडखोरी केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला. त्यानंतर मागील आठ महिन्यांपासून निवडणूक आयोगात सुनावणी सुरु होती. ही सुनावणी आता पूर्ण झाली असून बहुमताच्या आधारावर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे शिंदे गटात मोठा आनंद झाला आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !