राज्यस्तरीय Handboll स्पर्धेकरीता भाविका समर्थ हिची निवड..

0


14 वर्षवयोगटातील हॅण्डबॉल स्पर्धेत उल्लेखनिय कामगिरी.. 

CHANDRAPUR । 06 Feb 2023
नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या आदिवासी विभागाच्या हॅण्डबॉल व कबड्डी स्पर्धेमध्ये नागभिड तालुक्यातील चिंधी (चक) येथील आदिवासी मुलींच्या शासकिय पोष्ट बेसिक आश्रम शाळेत शिकत असलेल्या कु. भाविका धनराज समर्थ हिची राज्यस्तरीय 14 वर्ष वयोगटात हॅण्डबॉल स्पर्धेकरीता निवड झाली आहे. 
तिने नागपूर येथे झालेल्या विभागीय स्पर्धेमध्ये कबड्डी व हॅण्डबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. 
आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत विभागस्तरीय चिमूर प्रकल्पाच्या तिन दिवसीय क्रिडा स्पर्धा नुकत्याच नागपुरात पार पडल्या. यामध्ये यामध्ये चिमूर प्रकल्पातील विभागस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील कबड्डी स्पर्धेकरीता 12 मुले खेळाडू व हॅण्डबॉल स्पर्धेकरीता 12 मुली खेळाडू अशा एकूण 24 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. 
पुढील तिन दिवसीय राज्यस्तरीय स्पर्धा नाशिक येथे दि. 10 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली असून यामध्ये भाविका चिमूर प्रकल्पाचे राज्यस्तरीय स्पर्धेतमध्ये नेतृत्व करणार आहे. त्यासाठी भाविकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !