• खासदार अशोकभाऊ नेते यांच्या हस्ते ८ जानेवारी २०२३ ला ट्रेनला हिरवी झेंडी
• नागभीड स्टेशनवर होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन
नागभिड, दि. ०४ डिसेंबर २०२२
दक्षिण पुर्व मध्य रेल्वेच्या गोंदिया बल्लारपुर मार्गावरील महत्वपुर्ण असलेल्या नागभीड जंक्शन रेल्वे स्टेशनवर बिलासपुर चेन्नई सुपरफास्ट ट्रेन चा थांबा अखेर मंजुर झाला आहे. कोरोना काळात बंद झालेल्या सर्वच रेल्वेगाड्या आता सुरु झाल्या असुन या मार्गावरुन धावणाऱ्या एकाही सुपरफास्ट ट्रेनला नागभीड येथे पुर्ववत थांबा न दिल्याने प्रवाशांमध्ये असंतोष होता.
याची दखल घेत गडचिरोली चे खासदार अशोकभाऊ नेते यांच्या नेतृत्वात दपुम रेल्वे बिलासपुर झोनचे सदस्य व भाजपा चंद्रपुर जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांनी २ व ११ ॲागस्ट २०२२ ला नवी दिल्लीतील रेल्वे मंत्रालयात केंद्रीय रेल्वे मंत्री नाम. अश्विनजी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री नाम. रावसाहेब दानवे यांना याबाबत निवेदन देत अनुकुल सकारात्मक आश्वासन मिळवले होते. याबाबत संजय गजपुरे यांनी खासदार अशोकभाऊ नेते यांच्या माध्यमातुन सातत्याने पाठपुरावा केला . त्यामुळे सध्या बिलासपुर चेन्नई ( 12851 / 12852 ) सुपरफास्ट ट्रेन ला नागभीड जंक्शन रेल्वे स्टेशनवर थांबा मंजुर करण्यात आला आहे. लवकरच इतरही सुपरफास्ट ट्रेनचे थांबे मंजुर होणार आहेत.
येत्या ८ जानेवारी २०२३ रविवारला दु. ३.०० वाजता खासदार अशोकभाऊ नेते यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून बिलासपुर चेन्नई ( 12851 / 12852 ) सुपरफास्ट ट्रेन चा नागभीड जंक्शन रेल्वे स्टेशनवरील थांब्याचा शुभारंभ सोहळा करण्यात येणार आहे. यावेळी दपुम रेल्वेचे नागपुर मंडल प्रबंधक , स्थानिक आमदार बंटीभाऊ भांगडिया व इतर मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे . या कार्यक्रमाला प्रवाशी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती दपुम रेल्वे बिलासपुर झोनचे सदस्य संजय गजपुरे यांनी केले आहे.