परिवहन विभागातर्फे तालुकास्तरावर अनुज्ञप्ती (licence) शिबिराचे आयोजन

0

🚌🚚· दर महिन्याच्या ०८ तारखेला ऑनलाईन अपाँईंटमेंट नोंदणी होणार खुली!

चंद्रपूर, दि. ०७ डिसेंबर २०२२: 
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे पूर्वनियोजित ऑनलाइन अपॉइंटमेंट नुसार शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती इत्यादी कामांकरिता वरोरा, चिमुर, ब्रम्हपुरी, गडचांदूर व गोंडपिंपरी या तालुक्याच्या ठिकाणी एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दरमाह होणाऱ्या शिबिरासाठी प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला सदर शिबिराची ऑनलाईन अपाँईंटमेंट नोंदणी खुली करण्यात येणार आहे.


परिवहन विभागाच्या कार्यक्रमानुसार दिनांक 23 डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृह चिमूर, 26 डिसेंबर रोजी आनंदनिकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा, 27 डिसेंबर रोजी एन.एच.महाविद्यालय, ब्रम्हपुरी, 28 डिसेंबर रोजी शरद पवार महाविद्यालय, गडचांदुर व 29 नोव्हेंबर रोजी शासकीय विश्रामगृह गोंडपिपरी या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !