सिंदेवाही, दि. १७ डिसेंबर २०२२
तालुक्यातील पळसगाव जाट येथे श्री गुरुदेव सेवा मंडळ च्या वतीने रामधुन व ग्राम स्वच्छता करून गुरुदेव श्री संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
गुरुदेव श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला व पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
याप्रसंगी श्री गुरुदेव सेवा मंडळ पळसगाव जाट चेअध्यक्ष शिवाजी कामडी, क्षीरसागर कुळमेथे, इंद्रजीत गायकवाड, दिलीप कोठेवार,विठोबाजी गायकवाड, गुंजेवाही क्षेत्र सहाय्यक कुळमेथे साहेब,सुरेश ठाकरे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन रमेश तिकडे यांनी केली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गुरुदेव सेवा मंडळ पळसगाव जाट चे पदाधिकारी व सदस्य गण हा गावकरी यांनी अथक परिश्रम केले.