🎼· वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५४ व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचेही आयोजन..
🕉️· १२ ते १९ डिसेंबरपर्यंत भागवताचार्य ह.भ.प. सौ. वैभवीश्री जी (वृंदावन धाम) करणार प्रवचनात्मक मार्गदर्शन.
सिंदेवाही, १० डिसेंबर २०२२.
सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही (कोठा) ग्रामस्थांच्या सौजन्याने दि. १२ डिसेंबर ते १९ डिसेंबरपर्यंत स्थानिक गांधी चौकात श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
वृंदावन धाम येथील सुप्रसिद्ध भागवताचार्या ह.भ.प. सौ. वैभवीश्री जी हे या सप्ताहात आपल्या भक्तिमय वाणीतून उपस्थितांना भागवताज्ञानामृत देणार आहेत.
या सप्ताहाची सुरवात १२ तारखेला दुपारी १२ वाजता घटस्थापना करून करण्यात येणार असून १९ तारखेला प्रवचन, गोपालकाला पार पडून सायंकाळी महाप्रसादाने या सप्ताहाची सांगता होणार आहे.
या संपूर्ण सप्ताहात दैनंदिनपणे प्रातः ग्रामसफाई, भागवत प्रवचन (दिन), रामधून आणि भागवत प्रवचन (संध्या) असे कार्यक्रम पार पडणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
यासोबतच मानवतेचे महान पुजारी, ब्रम्हलीन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५४ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने १७ तारखेला रात्री ०८:०० वाजता भव्य राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या भजन स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री तथा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांचेहस्ते पार पडणार आहे. याचवेळेस माजी पोलीस पाटील तथा गुरूदेव सेवा मंडळाचे आजिवन प्रचारक सुधाकरराव चन्ने यांना सत्कारमूर्ती म्हणून गौरविण्यात येणार आहे.
आयोजित भजनस्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक (पुरूष गट) १५,०००/- व अन्य दहा आकर्षक पारितोषिक तर प्रथम पारितोषिक (महिला गट) ११,०००/- व अन्य दहा पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून खासदार अशोक नेते, सहउद्घाटक म्हणून नामदेव उसेंडी, उपाध्यक्ष म्हणून माजी जि. प. सभापती नागराज गेडाम, रमाकांत लोधे, विरेंद्र जयस्वाल, चंद्रशेखर चन्ने, स्वप्नील कावळे, तहसीलदार जगदाळे, ठाणेदार, अविनाश गोणेवार, राहुल पोरड्डीवार, सरपंच वसंत टेकाम, माजी जि. प. सदस्य रूपाताई सुरपाम, शंकर निषाद, निकास शेंडे, यशवंत गुणशेट्टीवार, पो. पा. वंदनाताई चन्ने, शोभाताई भेंडारे, उपसरपंच शालीनीताई गुरनूले, राजेंद्र खाडे, अरूण मादेशवार, राजेंद्र गुणशेट्टीवार तसेच अबालवृद्धांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या सर्व कार्यक्रमांस उपस्थित रहाणार असून परीसरातील जनतेनी आयोजित भागवत सप्ताह व भव्य खंजेरी भजन स्पर्धेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.