पौवनी-गोवरी ते राजुरा रस्ता जड वाहतुकीस बंद!

0

जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांचे आदेश.

पौवनी-गोवरी ते राजुरा या रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे याठिकाणी कोणतेही अपघात होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये. याकरिता सदर रस्ता २८ नोव्हेंबर २०२२ ते २७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत अशा तीन महिण्यांच्या कालावधीसाठी जड वाहतुकीस बंद करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी निर्गमित केले आहे.

त्यामुळे जड वाहनांनी पर्यायी रस्ता म्हणून राजूऱ्याकडून पडोलीकडे येणारी जड वाहतूक ही राजूरा-रामपुर-सास्ती पौवनी-हडस्ती-देवाडा-दाताळा-पडोली अशी वाहतूक करावी. आणि प्रसासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केले आहे.Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !