CHANDRAPUR | 04 SEPTEMBER 2024
मा.किरण भाऊ पांडव पूर्व विदर्भ समन्वयक यांचे मार्गदर्शनात तसेच किशोरजी राय संपर्कप्रमुख चंद्रपूर जिल्हा व शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या प्रतिनिधी यांना बांधकामगार कल्याण मंडळ चंद्रपूर येथे नोंदणीसाठी बांधकामगार हे कमी शिक्षण व अज्ञानाचा फायदा घेत ऑफिसच्या बाहेर दलाल सक्रिय होऊन हे रीनिवल साठी 1000 ते 2000 रुपये व नवीन नोंदणीसाठी 2000 ते 3000 रुपये घेऊन मजुरांची आर्थिक लूट करीत आहेत अशा तोंडी तक्रारी आमच्याकडे आल्या आहे.
तरी मा. सहाय्यक कामगार आयुक्त यांनी ही गैरसोय व आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी आपल्या कार्यालयात सेतू केंद्रकिंवा ऑनलाईन सर्विस त्वरित सुरू करून या शासनाच्या महत्त्वकांशी नाविन्यपूर्ण योजनाची बांधकाम कामगार यांना याचा लाभ मिळेल व होणारी आर्थिक लूट थांबेल या योजनेचा लाभ सर्व बांधकाम कामगारांना होऊन या योजनेपासून एकही पात्र बांधकामगार वंचित राहणार नाही. तरी आपण या पत्रावर सकारात्मक निर्णय घेऊन बांधकामगार यांना न्याय देण्याची काम करावे,अशी मागणी शिवसेनेचे शिंदे गटाचे उप तालुका प्रमुख बंडू पहानपटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.