नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे उमेदवार नागोराव गाणार यांच्या प्रचारार्थ घुग्घुस येथील विविध शाळांना भेटी व प्रचार..
घुग्घुस, दि. २७ जानेवारी २०२३.
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आज भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (आठवले गट) व मित्रपक्ष समर्थित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार श्री. नागोराव गाणार यांच्या प्रचारार्थ भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आज घुग्घुस येथील वियाणी विद्यामंदिर, प्रियदर्शनी कन्या विद्यालय, जनता विद्यालय, जनता कॉन्व्हेंट, प्रथमेश कॉन्व्हेंट, माऊंट कार्मेल तसेच ग्रेस इम्यॅनुल स्कुल अशा विविध शाळांना भेटी देऊन त्या ठिकाणी कार्यरत असणार्या मतदार शिक्षक व शिक्षिका भगिनींना श्री. नागोराव गाणार यांना पसंती क्र. ०१ चे मतदान करून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
शिक्षक बांधवांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी मा. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात राज्य सरकार प्रयत्नशील आहे.
शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आणि त्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याची धडपड असणारा एकमेव आमदार म्हणून नागोराव गाणारांकडे पाहिले जाते. गाणार सरांनी शिक्षकांच्या मागण्यांसाठी नेहमीच कटीबद्ध राहून सरकारला धारेवर धरण्याचे काम केले आहे. त्यांच्यासारखा एक सक्षम प्रतिनिधी विधिमंडळात असेल तर शिक्षक बांधवांचे प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी सहकार्य होईल.
त्यासाठी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुती समर्थित व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अधिकृत उमेदवार नागोराव गाणार यांना आपण सर्वांनी साथ देणे आवश्यक आहे. अशी विनंती या भेटीदरम्यान जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी शिक्षकांना केली.
याप्रसंगी सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिका तसेच भाजपचे विनोद चौधरी, प्रविण सोदारी, सुशिल डांगे, हसन शेख, हेमंत पाझारे, मुस्तफा शेख, श्रिनू कोत्तुर, पांडू थेरे, तुळशिदास ढवस, नितीन काळे, श्रीकांत बहादुर, गणेश बोबडे, गणेश कुटेमाटे, गुड्डू तिवारी, असगर खान, वमशी महाकाली, विनोद जंजर्ला, हेमंतकुमार आदी उपस्थित होते.